नवीन नांदेड। सिडको येथील एन डी ४१. के.२ राहूल नगर भागातील दिक्षा बौद्ध विहार समितीच्या वतीने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन उत्साहात साजरा. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर सेवा निवृत्त आरोग्य कर्मचारी पांडुरंग नगारे यांच्या हस्ते मुख्य पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव पदमणे, प्रल्हाद जोगदंड, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, शिवाजी कांबळे, जळबाजी हाटकर दिगंबर तूपसमुंदरे यांच्या सह वॉर्डातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन प्रा. शशीकांत हाटकर यांनी केले