संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त बंजारा समाज प्रबोधन मेळावा संपन्न-NNL

संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त मुखेडमध्ये विविध कार्यक्रम संपन्न 

मुखेड, रणजित जामखेडकर। 
बंजारा समाजाचे महान विज्ञानवादी क्रांतिकारक धर्मगुरू राष्ट्रसंत श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त आज दि. २७ फेब्रुवारी रोजी मुखेड येथील आर्य - वैश्य मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता भव्य बंजारा समाज प्रबोधन मेळावा समाजातील सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली यामध्ये बंजारा समाजातील महिला आपल्या विशेष वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयंती मिरवणुकीत जिल्ह्यातील विविध भागातुन आलेल्या समाजातील कलावंत,गायकांनी आपल्या बोलीभाषेतुन समाज प्रबोधनपर गित - गायणाच्या माध्यमातून संत सेवालाल महाराजांच्या जिवनावर प्रकाश टाकले.


या कार्यक्रमास बंजारा समाज मेळाव्याचे अध्यक्ष समाजाचे भुषण,जेष्ठ नेते मा.आ.कर्मवीर किशनराव राठोड, 
मुखेडचे लोकप्रिय आमदार डाॅ.तुषार राठोड , बंजारा क्रांतीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवीदास राठोड, मा‌.नगराध्यक्ष बाबुसावकार देबाडवार , भाजपा महिला अघाडी प्रदेश सदस्य प्रभा राठोड , डॉ. ज्योत्शनाताई तुषार राठोड, जि.प सदस्य संतोषभाऊ राठोड,प‌.स सभापती प्र.लक्ष्मण पा.खैरकेकर,मार्केट कमिटी सभापती खुशाल पा.उमरदरीकर, रिपाइं जिल्हाध्यक्ष गौतमजी काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड, भाजपा नेते व्यंकटराव लोहबंदे, प्रफुल राठोड,माजी प.स सभापती संध्याताई चव्हाण,भगवान राठोड, देवीदास राठोड, रिपाइं तालुकाध्यक्ष गोवर्धन पवार,भाजपा शहर अध्यक्ष किशोरसिंह चौहान,युवा नेतृत्व सुधीर चव्हाण,शिवाजी राठोड,दिपक मुकावार, विनोद दंडलवाड,शिवकुमार बंडे, समिर गजगे, राजु राठोड, सचिन चव्हाण, सुनिल राठोड, अशोक चव्हाण, वैभव राठोड, शिवाजी टेकाळे,वसंत जाधव, रणजित होनवडजकर, प्रकाश जाधव, विठ्ठल पाटील , रविंद्र चव्हाण, श्रिकांत पाटील यांच्या सह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी