दारूबंदी विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन नावाला दारू मिळते साऱ्या गावाला ..?
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरासह तालुक्यातील बाऱ्हाळी , मुक्रामबाद , गोजेगाव, वसुर, कबनुर, माकणी, जांब , बेटमोगरा , जाहुर ,चोंडी, मोटरगा, हिब्बट,राजुरा (बु), ईटग्याळ ( प.दे ),आंबुलगा , सांगवी, दापका , मंडलापुर,पाळा,एकलारा, हाळणी, धामणगाव , सावरगाव (पी) शिरूर (द) जांब (बु) हि गावे अवैध दारू विक्रीचे केंद्रबिंदू बनली आहेत.
मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये देशी,विदेशी,गावठी अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू झाल्याने तालुक्यात अक्षरशः अवैध दारुचा महापूर वाहतांना पहावयास मिळत आहे परंतु संबंधित दारूबंदी विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनान अश्यावेळी बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे.
तालुक्यातील सर्व पोलिस स्थानक व पोलीस चौकीच्या हद्दीतील गावांतील शाळा महाविद्यालये,मंदिर परिसरा जवळील हाँटेल्स, किराणा दुकान , पानटपरीवर तर काही ठिकाणी चक्क आँनलाईन अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिकासह युवा वर्ग व्यसनाधीन होत आहेत सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्यां दारूची अनेकांना चटक लागल्याने अनेकांच्या संसाराची राख-रांगोळी होत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांकडे स्थानिक पोलीस प्रशासनान व दारुबंदी विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मुखेड तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करून अवैध दारूविक्री थांबवावी अशी मागणी तालुक्यातील महिला मंडळाचे कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांतुन जोर धरू लागली आहे.