ऑनलाईन ॲप कर्जामुळे एका होतकरु तरुणाची आत्महत्या कुटुंबच उद्ध्वस्त झाले -NNL


नांदेड।
आजच्या अत्याधुनिक व आँनलाईन स्पर्धेच्या युगामध्ये मोबाईल ही अत्यावश्यक सेवेमध्ये समायोजित होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पण याचा जेवढा फायदा आहे तेवढे नुकसान सुद्धा आहे हे समजणे महत्त्वाचे आहे अशीच एक घटना पूर्ण जि.परभणी येथील अविनाश चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आँनलाईन अँप कर्जाच्या त्रासदायक घटणेमुंळे आत्महत्या केली आहे त्यामुळे त्यांचे कुटुंबच पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.

मोबाईल वर नेट सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेक कंपनीच्या व विविध आकृर्षक काही महत्त्वाच्या तर काही बनावट साईड ई-मेल आयडी येत आहेत काही तर बक्षीस लागल्याचेही ईमेल आयडी वरून एखादी साईट बनवून आपल्याकडे ग्राहक कसा आकर्षित करता येईल याची एक तंत्रशुद्ध आखणी यांच्याकडे उपलब्ध असल्याचे समजत आहे पण ग्राहकाने याकडे दुर्लक्ष करून कुठल्याही आमिषाला बळी न पडता मनावर ताबा ठेवल्यास ही वेळ तरुणावर विद्यार्थ्यांवर व मोबाईल वापर धारकावर ग्राहकावर येणार नाही.

बिहार. उत्तराखंड व दिल्ली जवळ काही बेरोजगार मुलांची अशी काही टीम बनावट काम करणारी टिम जमली आसल्याचे बोलले जाते इथे मोबाईल वरून अनेक प्रकारच्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करतात काहीजणांच्या बँकेतील रकमा काढून घेणे. काही जणांना अश्लील फोटो पाठवणे. काही जणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात बोलणे. संदर्भात लॉटरी लागल्याचा एसएमएस आदी माध्यमातून त्यांची एक टिमच या बाबतीत बनलेले आहे पण मोबाइल वापरणाऱ्यांना कृपया एस.एम. एस. व्हाट्सअप. फेसबूक.गुगल,मेलआयडी.व बनावट साईड वर जर आपली पूर्ण माहिती नाही दिली तर ही वेळ येणारच नाही...

कै.अविनाश चंद्रकांत सूर्यवंशी राहणार अमृत नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या आत्महत्येची कारणे त्यांच्या मोबाईलवर शोधल्या नंतर असे लक्षात आले की त्यांना कर्ज ॲपच्या माध्यमातून काही कर्ज उपलब्ध करून दिले होते पण ते कर्ज परतफेड केल्यानंतरही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर अतिशय अश्लील भाषा शब्दरचना करून त्यांना मजबूर केले शेवटी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देण्यात आले पण अशा तक्रारीवरून आत्तापर्यंत कुणालाही शोधून काढल्याचे समजले नाही किंवा त्यांचा शोध लागला असेल असे तरी दिसत नाही. पोलिस प्रशासनाच्या सायबर क्राईम हि आश्या घटना घडू नये म्हणून काही जनजागृती  सुद्धा करत नाही किंबहुना पोलीस प्रशासकीय यंत्रणेच्याही  पुढे चार पाऊल जाली बनावट करणारी अशी यंत्रणा या लोकाकंडे आहे की काय आशी शंका निर्माण होते.पण विनाकारण व सर्वसामान्य नागरिकांचे जिव मात्र यात निश्चित जातात.

 हि बनावट टिम (फ्राड) सर्व यंत्रणेचा फायदा घेऊन अनेकांची घरे. कुटुंब. व्यक्ती. उध्वस्त करण्याचे यंत्र जणू या माध्यमातून साकरले आहे आसे समजते.कै.अविनाश तारुण्याच्या वयात आत्महत्या केले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यात अशा आश्लील नामुष्की.मेसेज व समाजातील गेलेली इज्जतमुळे स्वतःही आयुष्य संपून कुटुंबाचेही जीवन उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे व पूर्णा परिसरातील याबाबतीत सर्वत्र चर्चा होत असून अशा कंपन्यांवर जर लवकर आळा बसला तर ठिक आहे नाहीतर अनेक प्रतिष्ठित  चागंले कुटुंब याचे बळी झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे म्हणून प्रशासन. पोलीस प्रशासन. व आधुनिक पद्धतीची यंत्रणा लावून अशा व्यक्तींना शोधणे अत्यंत गरजेचे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी