अनेकांनी केली भाकर भाजी सोबत दिवाळी साजरी
किनवट/नांदेड। मागील दीड ते दोन दशकांपासून वन मजूर म्हणून कार्यरत असणारे कामगार दिवाळी पूर्वी उप वनसंरक्षक कार्यालयापुढे दिनांक १७ ते १९ ऑक्टोबर असे तीन दिवस थकीत वेतन देण्यात यावे आणि कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे म्हणून सीटूच्या झेंड्याखाली उपोषणास बसले होते.
तेव्हा उप वनसंरक्षक श्री केशव वाबळे आणि सहायक वन संरक्षक किनवट तसेच वन परीक्षेत्र अधिकारी माहूर यांच्या उपस्थितीत सीटूच्या शिष्टमंडळा सोबत बैठक घेऊन मागण्या मंजूर झाल्याचे लेखी पत्र संघटनेस दिले आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे वन मजूरांचे थकीत वेतन दिवाळी पूर्वी अदा करण्यास वन विभागाला अपयश आले आहे.
त्या अनुषंगाने आणि इतर प्रश्नाबाबत संघटनेची त्रेमासिक बैठक माहूर तालुक्यातील डोंगर दऱ्यात असलेल्या वझरा शेख फरीद येथील बंद असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोप वाटीकेत दिनांक २९ ऑक्टोबर रोजी संघटनेचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. बैठककिस स्थानिक कमिटीतील पदाधिकारी व वन मजूर मोठ्या संख्येने सामील झाले होते.
बैठकीतून अध्यक्ष कॉ. गायकवाड यांनी किनवटचे सहायक वन संरक्षक श्री गणेश गीरी आणि माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी श्री रोहित जाधव यांच्याशी फोन वरून चर्चा केली आणि वन रक्षक आणि वनपाल यांच्याकडे कामगारांची पडताळणी करून थकीत वेतन अदा केले जाईल व माहूर तालुक्यातील पाचही रोप वाटिका बंद आहेत. त्या चालू करणेसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवीला असे सांगितले.
झालेल्या बैठकीत कामगारांनी काही मागण्या संघटनेच्या वतीने करण्याचे ठरले असून त्या मध्ये पुढील सात दिवात वन रक्षक, वनपाल यांना माहूर रेंज मध्ये बोलावून केलेले काम व ठीकाणाची पडताळणी करून थकीत वेतन अदा करावे आणि लेखी आश्वासना प्रमाणे तात्काळ कामावर घ्यावे. मागील दोन दशकापासून जंगलाचे रक्षण करणाऱ्या वन मजुरांना सेवेत कायम करून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे. तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल पाठवून काही वन मजुरांना नोकरी पासून वंचीत ठेवले आहे त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात यावी.आदी मागण्याचे निवेदन उप वनसंरक्षकनांदेड,सहायक वनसंरक्षक किनवट,वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना सोमवारी देण्याचे निश्चित झाले आहे.
सदरील बैठकीस युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,माजी सरसिटणीस कॉ.बबन वाहुळकर,कॉ.लता गायकवाड,स्थानिक कमिटीचे पदाधिकारी सचिव कॉ.मधुकर राठोड,कोषाध्यक्ष कॉ.डीगांबर टेंबरे,उपाध्यक्षा कॉ.सजूबाई राठोड,कॉ.माधव धुपे, कॉ. दिलीप पाईकराव,शकुंतलाबाई कोठेकर, सह सचिव शकीलाबाई शेख युनूस,गौतम रणवीर,भीमराव सिडाम,साईनाथ टेंबरे,चंद्रकांत लोखंडे,गजानन पिसाळकर, रमेश वाघमारे, राधाबाई रनमले, साहेबराव दुमारे,परमेश्वर भडंगे, श्रावण वायकुळे,सचिन वाहुळकर, प्रयागबाई लोखंडे, प्रदुम वाहुळकर,क्रांती लोंढे आदींची उपस्थिती होती.