दारूविक्री बंद झाली नाहीतर पुन्हा ठाण्यात येऊन बसू असा इशारा महिलांनी दिला
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम येथे देशी दारू विक्री करणार्यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे गावातील मजुरदार, शेतकरी व युवा पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असून, यामुळे अनेकांचे संसार देश घडविला लागत आहे. हा प्रकार वेळीच थांबवून दारू विक्रेत्यांना लगाम लावावा अशी मागणी सरसम येथील महिला मंडळीच्या शिष्टमंडळांनी आज हिमायतनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन निवेदनाद्वारे केली आहे. दारूविक्री बंद झाली नाहीतर पुन्हा ठाण्यात येऊन बसू आणि परत घराकडे जाणार नाही असा इशारा महिलांनी दिला आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या विनापरवाना देशी दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. यामुळे अनेक जण व्यसनाधीन होत असून, दिवसभर काम केल्यानंतर आलेली मजुरी सर्व दारू ढोसण्यात घालत असल्याने अनेकांच्या कुटुंबाची राख रांगोळी होते आहे. एवढेच नाही तर शालेय वयातील विद्यार्थी देखील दारूच्या आहारी जात असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन दिली मात्र गावातील दारू काही दिवस बंद होऊन पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद व्हावी अशी मागणी आज 30 ते 40 महिलांच्या शिष्टमंडळांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात येऊन निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचे दखल घेऊन दारू विक्रेत्यांना लगाम लावण्यात येईल आपण बोलवलं तेंव्हा आमचे कर्मचारी येऊन नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहेत. असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाराजन यांनी दिले असून, आता तरी गावातील अवैध दारू विक्री बंद होईल का..? याकडे सरसम वासीयांसह हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. या निवेदनावर संगीतबाई मिराशे, पद्मिनी देवराये, सुरेखा शिंदे, चंद्रकला कटकमवाड, सुमनबाई वानखेडे, नीलाबाई देवराये, चंद्रकला वाठोरे, अनुसया सावंत, सिंधूबाई वानखेडे, चंद्रकला डांगे, रेणुकाबाई आडबलवाड, ताराबाई बोले, सुमनबाई कल्याणकर, सुभद्राबाई जाधव, धुरपताबाई ठाकूर, बेबीताई मोरे, सुभद्राबाई इंगळे, शांताबाई पतंगे, शोभाबाई पसलवाड आदींसह शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गावात दारू विक्रीचा प्रकार चालू असल्याने गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील देशमुख यांनी चार दिवसापूर्वी हिमायतनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनूर भोसले यांना हा प्रकार लक्षात आणून देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी धडक कार्य करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज दि.२९ रोजी महिला मंडळीच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात दाखल होऊन निवेदन दिल असल्याने या गावात कशाप्रकारे दारूची विक्री केली जाते हे यावरून स्पष्ट होते आहे. महिला मंडळींनी दिलेल्या निवेदनात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे नावे सुद्धा लिहिली असून या विक्रेत्यांना कायमचा चाप बसेल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवेदनावर शेकडो महिला मंडळींच्या व गावातील युवावर्गाच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हिमायतनगर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विनापरवाना दारू विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे का...? लक्ष देत नाहीत असा सवालही आता समोर येऊ लागला आहे. खरे पाहता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने ठिकठिकाणी धाडी टाकून विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी केवळ महिन्याकाठी भेट देऊन स्वहित साधून परत जात असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध्य रित्या दारू विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे सर्व प्रकार पाहता आता तरी कुंभकर्णी झोपत असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी जागे होतील का..? आणि विनापरवाना दारूचा धंदा मांडून वातावरण दूषित करू पाहणार्यावर कार्यवाही करतील का...? असा प्रश्नही या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.