नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार (एसटी डेपो) येथे दि. २० ऑक्टोंबर २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता नांदेड एसटी विभागीय यंत्र अभियंता (चालन) पदावर पदोन्नतीने निवड झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्याबद्दल नांदेड आगार (एसटी डेपो) कामगार कर्मचार्यांच्यावतीने त्यांचा हृदय सत्कार करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागीय कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, विभागीय वाहतुक अधीक्षक संजय वाळवे, नांदेड आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनमंतराव ठाकूर, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन श्रीनिवास रेनके, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख नागोराव पनसवाड, सहाय्यक वाहतुक निरीक्षक विठ्ठल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगार कामगार कर्मचार्यांच्या वतीने गुणवंत एच. मिसलवाड यांनी मंगेश कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करुन अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मंगेश कांबळे यांनी यापूर्वी विभागीय उपयंत्र अभियंता (चालन) व नांदेड आगार व्यवस्थापक प्रभारी पदी असताना सर्व कामगार, कर्मचार्यांशी चांगला समन्वय ठेवून प्रवाशी बांधवांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्नशील राहीले असे प्रतिपादन करुन पुढे बोलताना ते म्हणाले की, आता विभाग नियंत्रक पदाचाही पदभार त्यांच्याकडे असून भविष्यात अशीच भावना राहावी अशी अपेक्षा सर्व कामगार, कर्मचार्यांच्यावतीने व्यक्त केली. शेवटी सत्काराला उत्तर देताना मंगेश कांबळे म्हणाले की, सध्या दिपावलीचा हंगाम असून सर्व कामगार, कर्मचार्यांनी जास्तीत जास्त काम करुन प्रवाशी बांधवांना उत्तमोत्तम दर्जेदार सेवा देण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करुन सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास राजेंद्र निळेकर, राजेश गहिरवार, कैलास राठोड, विजय सुर्यतळे, संदीप धनसडे, रवीकुमार ढवळे, सिद्धार्थ जोंधळे, नितीन मांजरमकर, ओम कोटुरवार, मयुर गायकी, भगवान सोनकांबळे, मंगेश कांबळे, ए.पी. जाधव, विजय खेडवनकर, प्रसाद गोंदगे, कृष्णा पवार, विनोद हातागळे, संतोष सोनटक्के, दिपक भंडारी, राजे घंटे, दिपक मुदीराज, राजू कांबळे, पंढरीनाथ मुरकुटे आदी कर्मचारी, कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.