महात्मा फुले महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांची नोकर भरतीमध्ये उत्तुंग भरारी -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील " करीयर कट्टा " केंद्रा मार्फत दि.१९ रोजी विविध क्षेत्रातील गुणवंत व यशवंत झालेल्या महाविद्यालयीन २६ विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. केवळ शिक्षण देऊन न थांबता त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे हे महाविद्यालय आहे . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , नायब तहसीलदार महेश हांडे तर व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए.एन.गित्ते हे उपस्थित होते . याप्रसंगी कु. रंजिता वल्लेपवाड , कु. दीक्षा गायकवाड , कु.सुप्रिया कांबळे , कु.निकिता सोनकांबळे, निखिल कांबळे, लोकडेश्र्वर कांबळे, कु.सना शेख, कु.निकिता नालापल्ले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . मान्यवरांच्या हस्ते सर्व यशवंत विद्यार्थी व पालकांचे शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आलास . 
         
मान्यवरांच्या भाषणात नायब तहसीलदार महेश हांडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयांतर्गत चालणाऱ्या सर्व विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुक करून प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिने आणि करीयर कट्टा टीमचे अभिनंदन केले . विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द, वेळेचे नियोजन , मेहनत , योग्य मार्गदर्शन आणि विषयाची नीट नेटकी तयारी करण्यास सांगितले . 

बदलत्या स्पर्धा परीक्षेनुसार स्वतःला बदलणे गरजेचे आहे ." स्वतःला बदलून स्वतःला घडवा " असा मौल्यवान संदेश दिला . पो.निरिक्षक विलास गोबाडे यांनी आपल्या भाषणातून स्वतः कसे घडले याची पार्श्वभूमी सांगत विद्यार्थी हे स्वतः स्वतःचे निर्माते कसे आहेत ? त्यांना स्वतःची जाणीव , ज्ञान आणि कार्यावरील विश्वास कसा असावा लागतो याविषयावर सखोल असे मार्गदर्शन केले 

अध्ययक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिने यांनी शिक्षण , स्पर्धा परीक्षा आणि उत्तुंग करियरचे ग्रामीण संकुल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अशी ओळख निर्माण होताना महाविद्यालयाचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने मनस्वी आनंद वाटत आहे . यशवंताचा गौरव करताना त्यांच्या व परिवाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद ज्ञानदानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च कार्य आहे असे मला वाटते . 

समाजात ज्ञानदानाच्या बरोबर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय सदैव अग्रेसर आहे आणि भविष्यात देखील अधिक जोमाने कार्य करेल असा आशावाद याक्षणी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष शेंबाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. डी.के. आहेर , प्रा.डॉ.विजय वारकड , प्रा.डॉ.मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शिवसर्जन टाले यांनी केले . यावेळी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , पालक आणि पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी