हदगांव,शे चांदपाशा। राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज्यातील MIDC च्या विविधस्तारावरअसलेले भुखंड वितरणाला स्थगिती देण्यात आली होती. आता ती स्थगिती उठविण्यात आलेली आहे. पण आमच्या हदगाव तालुक्यातील शहर शहराजवळ तामसा रोडवर माजी आमदाराच्या काँलेज समोर MIDCचा मोठा लोंखडी बोर्ड गेल्या दोन दशकापासुन दिमाखात उभा आहे.
नेमकी ही MIDC कुठं गेली या बाबतीत नवीन सरकार शोधून देईल का..?असा प्रश्न तालुका वासीयांना पडलेला असुन या बाबतीत माञ तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांना याचा विसर पडलेला दिसुन येत आहे. सदर MIDC ची जागा पण घेण्यात आली होती. नेमके या बाबतीत काय घडले की केवळ तिथे उद्योग येण्या ऐवजी गेल्या अनेक वर्षा पासून झाडे झूडपे वाढतांना दिसुन येतात. तालुक्यातील राजकीय बडे नेते या बाबतीत माञ 'मौण ' पाळलेले दिसुन येत आहे.
या बाबतीत काही जबाबदार नेत्यांना या बाबतीत माहीती विचारली असता ते पण या बाबतीत फारसे गंभीर दिसुन आलेले नाहीत. कारण हदगाव तालूका औदयोगिक दृष्ट्या फार मागे आहे येथे रोजमजुरी करिता अन्य भागात इथल्या मजुरांना जाव लागत जर येथे औद्योगिक वसाहत होत असेल तर नेमका 'खोडा 'कोणी घातला या बाबतीत शोध घेणे महत्त्वाचे आहे. या बाबतीत आता उठाव शिवाय पर्याय नसल्याचे अनेक नागरिकानी बोलुन दाखवले आहे.