बालाजी मंदिर हडको येथिल वडा व लाडू लंडन व जर्मनी येथे रवाना -NNL


नवीन नांदेड।
हडको येथिल श्री.बालाजी मंदिरातील नवरात्र ब्रम्होत्सव निमित्त केल्या जाणाऱ्या गंगाळ व त्याहून लोकप्रिय असलेला तिरुपती बालाजी येथील प्रसादा सारखा वडा व लाडू चा प्रसादाची या वर्षी लंडन व जर्मनी येथे भक्तांनी केलेली मागणी ची दखल घेत पार्सल द्वारे रवाना करण्यात आला आहे, याबद्दल विश्वस्त समितीने आंंनद व्यक्त केला.

बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने नवरात्र ब्रमहोत्सव निमित्त प्रसादात वडा व लाडू चालू केला थोड्या वर्षातच याची प्रसिध्दी इतकी झाली की पार्सल ने मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, हेद्राबाद सह संपूर्ण महाराष्ट्रात तर होतेच आतातर चक्क लंडन येथील विवेक मामीडवार व जर्मनी येथील शुभम मिरजकर यांनी वडा व लाडू मागविला. संबंधित भक्तांनी आँनलाईन रक्कम जमा केल्यानंतर विश्वस्त समितीने याबाबत दखल घेऊन तात्काळ संबंधित पत्यावर पार्सलव्दारे पाठविण्याचा व्यवस्था केली असून, मंदिर परिसरात दिवस व रात्र बालाजी आनेराव व २० महिला पुरुषांच्या साह्याने हा वडा व लाडू बनविले जात असून  विदेशासह महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांत व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे.

जर्मन व लंडन येथे ३ सप्टेंबर रोजी हे पार्सल विश्वस्त  मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बाबुराव येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी  माणिकराव देशमुख , संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख  यांच्या ऊपसिथीत पाठविण्यात आले व विदेशात आपला प्रसाद जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी