( कामेवार यांचा यशस्वी पाठपुरावा )
नांदेड| तरोडा भागातील राहणार्या निर्मला सोनटक्के यांना हृदययावर क्षस्त्रक्रीया करन्यासाठी नांदेड येथील भगवती रूग्नालयात दाखल करन्यात आले होते. परंतू निर्मला सोनटक्के ह्या बांधकाम कामगार असल्यामुळे त्यांना क्षस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता ही बाब आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नांदेड कक्षप्रमुख सुभाशिष कामेवार यांना समजली तात्काळ आमदार कल्यानकर यांनी शिफारस पत्र देऊन सुभाशिष कामेवार यांना पाठपुरावा करन्याच्या सुचना केल्या.
कामेवार यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून फाईल मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला पाठवली व कक्षाचे कक्षप्रमुख तथा मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या कानावर ही बाब टाकली व जास्तीत जास्त मदत करन्याची विनंती चिवटे यांना केली. मंगेश चिवटे यांनी अवघ्या 5 दिवसात निर्मला सोनटक्के यांना 75 हजारूपये निधी रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळे माझा जिव वाचला व दिवाळी गोड झाल्याची भावना निर्मला सोनटक्के यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.