पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला -NNL


नांदेड,अनिल मादसवार।
नुतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज नांदेड पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला. सदर कार्यक्रमात नांदेड जिल्हयाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना निरोप देण्यात आला. 

सदर कार्यक्रमात नांदेड पोलीस दल येथे बदलुन आलेले पोलीस अधीक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात मा. प्रमोद शेवाळे तत्कालीन पोलीस अधिक्षक याना नांदेड पोलीस दलातर्फे सहपत्नी शाल श्रीफळ व मेट वस्तु देवून निरोप देण्यात आला. प्रमोद शेवाळे यांनी नांदेड पोलीस दलाचा मागील दोन वर्षांपासून कामकाज करताना जनतेने, विवीध राजकीय पक्षातील नेत्यांनी, प्रसार माध्यमांनी व अधिकारी अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केल्याने त्याचे आभार मानले आहे.

सदर कार्यक्रमास मा. श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक(मु.) नांदेड, मा. अर्चना पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग भोकर, मा. श्री. चंद्रशेन देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, मा. श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद, मा. श्री. सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, मा. डॉ. सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा, मा. श्री. मारोती धोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, मा. श्री. द्वाकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, मा. श्री. जगदीश भंडरवार, पोनि पोस्टे वजिराबाद, मा. श्री. आशोक घोरबांड, पोनि पोस्टे नांदेड ग्रामीण, मा. श्री. भगवान धबडगे, पोनि पोस्टे इतवारा, मा. श्री नितीन काशीकर, पोनि पोस्टे शिवाजीनगर मा. श्री. सुधाकर आडे, पोनि पोस्टे भाग्यनगर, मा. श्री. अनिरूध्द काकडे, पोनि पोस्टे विमानतळ मा. श्री. विजय धोंडगे, रापोनि पोमु, नांदेड, मा. श्री चंद्रकांत जाधव, कार्यालयीन अधीक्षक, मा. श्री. शिवाजी लष्करे सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, सर्व पोलीस प्रभारी अधिकारी व मंत्रालयीन कर्मचारी इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुतन पोलीस अधीक्षक यांनी सर्व अधिकारी व अंगलदार, मंत्रालयीन कर्मचारी व जनतेस दिवाळी निमीत्त शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक(मु.) नांदेड यांनी केली व सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सपोउपनि श्री विठठल कते यानी केले. आभार प्रदेशन श्री प्रशांत देशपांडे, पोनि जिवीशा यांनी केले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी