सिडको परिसरातील स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य किटचे वाटप...NNL


नविन नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिवाळी निमित्ताने वाटप करण्यात येणाऱ्या आनंद शिधा जिन्नस चे वाटप सिडको परिसरातील जवळपास ३७७८ किट उपलब्ध झाले असून परिसरातील अनेक दुकानातून संबंधितांना वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न नागरी पुरवठा विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा नुसार दिवाळी सणाच्या निमित्ताने आंंनद शिधा जिन्नस वाटप  स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाल्या नंतर २२ आक्टोबंर रोजी वाटप करण्यात आले तर  काही ठिकाणी वाटप प्रकिया चालू होती.

सिडको परिसरातील स्वस्त धान्य दुकान असलेले रमेश गांजापुरकर ४९३, मिसाळ ५७०, पेदावाड७०९, पांचाळ ४०८, लांडगे ६३०, महादाबाई पवळे ५३२, नंदु बनसोडे ४४६, या दुकानात एकुण ३७८८ किट उपलब्ध झाल्या असून २२ आक्टोबंर रोजी सिडको येथील गांजापुरकर यांच्या स्वस्त धान्य दुकान मध्ये या किट चा वाटप सिडको शिवसेनेचे माजी शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे नांदेड जिल्हाअध्यक्ष रमेश गांजापुरकर यांच्या ऊपसिथीत वाटप करण्यात आले आहे, दिवाळी सणाच्या निमित्ताने या किट घेण्यासाठी संबंधीत स्वस्त धान्य दुकान मध्ये संबंधितांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी