दिवाळीच्या पावनपर्वानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा -NNL


मुंबई|
दिवाळीच्या पावनपर्वानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून येत्या नववर्षात राज्यातील बळीराजा समृद्ध होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शुभसंदेशात म्हणतात, आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण हा लोकजीवनाचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक जीवन, संस्कृती आणि नातेसंबंध यांची वीण घट्ट करणारा सण म्हणजे दीपोत्सव. यामुळे दैनंदिन जगण्यातील मरगळ नाहीशी होऊन मन प्रफुल्लित होते. बहीण-भाऊ, पती-पत्नी, नातेवाईक यांच्यातील परस्पर नात्यांच्या भावना वृद्धिंगत करणारा सण म्हणजे दीपोत्सव. 

अंध:कार नष्ट करणारा संस्कृतीचे प्रतीक असणारा दीप, प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही देतो. राज्य विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असून सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्याच्या विकास यात्रेला लोकचळवळीचे रूप यावे आणि लोककल्याणकारी योजनांमध्ये सर्वांचा सहभाग नोंदवला जावा, या सदिच्छांसह राज्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या खूप शुभेच्छा !

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी