नृत्य झंकार कार्यक्रमाने रंगली दिवाळी सांज - NNL


नांदेड|
दिवाळी पहाट कार्यक्रमाने दरवर्षी संगीताने विविध मान्यवरांच्या आवाजात सुरमई दीपावली साजरा करण्याचा योग नांदेडकरांना मिळत असतो त्यातच गेल्या काही वर्षापासून संध्याकाळच्या दिवाळी सांज कार्यक्रमांमध्ये नृत्य अविष्काराने या कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणत आहेत. 


यावर्षी दिवाळी सांज 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी बंदा घाट येथे संपन्न झाले यात डॉ. सान्वी जेठवाणी व शुभम बिरकुरे दिग्दर्शित नृत्य झंकार ने प्रेक्षकांची वाहवा मिळवले. सदरील कार्यक्रमाचे संकल्पना व निर्मिती निळकंठ पाचंगे यांनी हाती घेतली होती. सदरील कार्यक्रमाला सुरुवातीला लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे चिमुकले विद्यार्थ्यांनी गणेश वंदनाने सुरुवात केली, तत्पश्चात विविध शास्त्रीय नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यात कुमारी श्रुती पोरवाल हिने कथ्थक कृष्ण भजन कुमारी गौरी देशपांडे हिना शंकर भरणम् भरतनाट्यम् कुमारी ईशा जैन हिने शिवस्तुती सादर केली तर दिवाळी सण या आपल्या भावा अभिनया ने कुमारी अनुष्का व समूह यांनी दर्शविले तर महालक्ष्मी स्तुती घेऊन कुमार विशाल भोकरे यांनी वेगळीच रंगत आणली. 


या कार्यक्रमाला दोन सत्रा मध्ये सादरीकरण करण्यात आले पहिले सत्र म्हणजे शास्त्रीय नृत्य आणि दुसरा म्हणजे लोकनृत्य या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सविस्तर माहितीसह आपल्या दमदार अभ्यासू शैलीत डॉ. अश्विनी चौधरी, कार्यक्रमाचे दिग्दर्शिका डॉ. सान्वी जेठवाणी व सोबतच रागेश्री जोशी यांनी केले. लोक नृत्य मध्ये चित्रपट शैलीत गोंधळ जागरण जोगवा लावणी अशा अनेक नृत्याने प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. 


पोटासाठी नाचते मी या उत्कृष्ट अशा विरह लावणीने गणेश काकडे ना प्रेक्षकांना स्तब्ध केले. लोक नृत्यामध्ये कुमारी साक्षी मणियार, कुमारी पलक जैन श्रद्धा ओझा माधुरी लोकरे सुहानी नायडू आरोही डोंगरदिवे अन्य कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला होता. सर्व कलावंतांचे सन्मान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, आ.‌अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी मंत्री डीपी सावंत, सभापती किशोर स्वामी  अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी