मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी -NNL

उपमुख्यमंञी फडणवीस खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण तर मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढाव


मुंबई।
मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19, व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या ची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले.


पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.


मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ करत आहे व सर्व व्यवस्था व नियोजन हे अंतिम टप्प्यात असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह या अधिवेशनाचा आढावा नुकताच घेतला व काही सूचना केल्या व पुढील नियोजनाबद्दलही सर्वांची चर्चा केली. 

या अधिवेशनाचे निमंत्रण विविध मान्यवराला देण्यात आले असून परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले तर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले.

 अनेक मान्यवर या अधिवेशनात उपस्थित राहणार असून पत्रकारांच्या विविध विषयावर या अधिवेशनात चर्चासत्र उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत व अधिवेशन भव्य दिव्य होत असून पिंपरी चिंचवड पत्रकार संघ हा उत्साहाने या अधिवेशनाची जोरदारपणे तयारी करत आहे या अधिवेशनास राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित रहावे व हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी