नविन नांदेड। सामाजिक बांधिलकी जोपासत सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दिपावली निमित्ताने परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी यांना फराळाचे वाटप केले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्ताने नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटनेचा सिडको शाखेच्या वतीने २२ आक्टोबंर रोजी वृत्तपत्र विक्रेते यांना फराळाचे वाटप नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे व वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे ,नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, तिरूपती पाटील घोगरे, छायाचित्रकार सांरग नेरलकर , लोकमत वितरणाचे संजीव कुमार गायकवाड, सुधाकर काकडे, सिडको वृत्तपत्र विक्रेते अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव बालाजी सुताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको टिन शेड सेंटर येथे वाटप करण्यात आले, यावेळी जेष्ठ विक्रेते व पदाधिकारी उपस्थित होते.
या ऊपकमाचे ऊपसिथीत मान्यवरांनी ऊपकमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व वेगवेगळे ऊपकम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे,व वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी केले. यावेळी जेष्ठ विक्रेते मदनसिंह चव्हाण दौलतराव कदम शेख सयोधदीन महिला वितरक वंदना लोणे यांच्या सह राजु चव्हाण, गणेश चव्हाण, गणेश कांबळे,अनिल धांवडे,शुभम , यांच्या सह पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते.