हिमायतनगर| अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यात नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना 42 कोटी 74 लाख 7 हजार 200 रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचा धनादेश आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी वाडेकर यांना दि.०४ रोजी तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार डि. एन. गायकवाड, हादगावचे तहसीलदार जीवराज डापकर, नायब तहसीलदार अनिल तामस्कर, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, बापूराव आडे, आदीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याचंवेळी हिमायतनगर शहरासह तालुक्यात सेवा पंधरवाडा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक व तहसील कर्मचाऱ्यांचा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.