मंदिर परिसरातील रस्त्यावरून नगरअध्यक्षा बद्दल भक्तांच्या प्रतिक्रिया
किनवट, माधव सूर्यवंशी। शहरातील प्रसिद्ध मंदिर असलेले साईबाबा मंदिर व गजानन महाराज संस्थान मंदिर परिसरातील रोडचे काम गत 25 वर्षापासून रखडलेले होते, पण भगवंतावर अफाट श्रद्धा असलेले किनवट शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी ते आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतच सिमेंट रस्त्याचे पक्के काम करून दाखवल्यामुळे श्री साई भक्तांनी व श्री गजानन महाराज भक्तांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया नोंदविल्या.
याबद्दल नगराध्यक्ष मच्छेवार मनाले की, धार्मिक कार्याकर्ता शहरातील एकमेव असे गजानन महाराज मंदिर संस्थान आहे. तेथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम त्यात हरिनाम सप्ताह, लग्नकार्य, अनेक नामवंत महाराजांचे कीर्तन, प्रवचन, सामाजिक कार्यक्रम इत्यादी मोठ मोठी कार्यक्रम तेथे पार पडत असतात. मग तेथे पक्का रस्ता होणे अत्यंत आवश्यक होते. आणि तशी मागणीही माझ्याकडे संस्थान कडून व भाविक भक्ताकडून होत होती. ते काम कोणत्याही परिस्थिती पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्यच होते.
आणि ते आम्ही करून दाखवले यात मला खूप मोठे समाधान आहे, की मला यश मिळाले. आणि शहरांमध्ये अनंत विकासाची कामे केलीत ते करण्याकरता माझ्या सर्व सहकार्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांनीही माझ्या खांद्याला खांदा लावत साथ दिली.म्हणूनच माझ्या कार्यकाळात शहरांमधील विकास कामे, योजना राबवण्यास मला यश मिळाले. आणि भविष्यात बरेच काही कामे करायची असून ती पूर्णत्वास जावो हीच ईच्छा आहे. अशाही शेवटी नगराध्यक्षांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.