खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा यशस्वी पाठपुरावा
नांदेड| जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी प्रधानमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी खा. प्रतापराव चिखलीकर यांची सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यात आणखीन भर पडली असून जिल्ह्यातील आठ रुग्णांना प्रधानमंत्री आर्थिक मदत मंजूर झाली असून निधी मंजुरीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आले.
गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता यावे, त्यांचे आरोग्य सुखी आणि समृद्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून प्रधानमंत्री सहायता निधी मंजूर केला जातो. या निधीतून नांदेड जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना आतापर्यंत आर्थिक मदत देऊन जीवदान देण्यात आले आहे. यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांना या निधीचा मोठा फायदा झाला.
आता अर्धापूर तालुक्यातील बेलसर येथील श्रीमती अनुजा अविनाश क्षीरसागर यांना उपचारासाठी 79 हजार आठशे रुपये, बिलोली तालुक्यातील दगडापूर येथील शेख जिशान शेख पाशा यांच्या उपचारासाठी दोन लाख चार हजार 572 रुपये, नांदेड तालुक्यातील फतेपुर येथील सत्यम मधुकर सांगेकर यांच्या उपचारासाठी तीन लाख रुपये, देगलूर तालुक्यातील हावरगाव येथील शिवराज गणपतराव हसकुडे यांना एक लाख बारा हजार पाचशे रुपये , लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील कुमारी श्रुती रामदास कऱ्हाळे हिच्या उपचारासाठी तीन लाख रुपये, अंतेश्वर येथील चिरंजीव सर्वज्ञ रामदास कऱ्हाळे यांच्या उपचारासाठी तीन लाख रुपये.
पीरबुरहान नगर येथील श्रीमती शहाणा बेगम अब्दुल यांच्या उपचारासाठी तीन लाख रुपये, मुखेड तालुक्यातील कलंबर येथील श्रीमती पुष्पा मारुती किने यांच्या उपचारासाठी 50 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी खा.चिखलीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले. निधी मंजूर झाल्याचे पत्र भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार मानून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी उप नगराध्यक्ष जफरोद्दीन बहोद्दिन यांची उपस्थिती होती.