खुलेआम चालणारे मटका व जुगार अड्डे बंद करा / भाजपा.राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
नादेड| हदगाव शहरात व परिसरात बिनधास्तपणे मटका व जुगाराचे आड्डे चालत असुन, ते त्वरीत बंद करण्यात यावे. अन्यथा पोलिस स्टेशन समोर आदोंलन व उपोषण करण्याचा इशारा भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व संरपच परिषदने एका निवेदन द्वरे हदगाव पोलिस स्टेशनला दिलेला आहे.
त्यांनी दि.२८सप्टेबर २०२२रोजी स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, हदगाव शहरात व परिसरात आनेक दिवसा पासून मटका व जुगार खुलेआम सुरु आहे. यामुळे अनेक गरीब मजुर शेतमजुर लालसेपोटी बळी पडत असुन, अनेक परिवार या मटका जुगारामुळे उध्वस्त होत आहेत. मटका जुगार खेळणारे जुवारी हे आपल्या घरातील मौल्यवान वस्तु तर विकतच आहे. पण आपल्या पत्नीचे मंगळसुञ पण विकतांना दिसुन येतात. या मुळे हदगाव पोलिस स्टेशनच अवलोकन केल्यास क्राईमरेट वाढतांना दिसुन येत आहे. याला कारणीभूत शहरात व परिसरात चालणारे अवैध मटका व जुगार अड्डे आहे.
असा गंभीर आरोपही दिलेल्या निवेदनात करण्यात आलेलं आहे. शहरात नवीन बस्थानक परिसरात तर उघड उघड मटक्याचे अड्डे थाटण्यात आलेले आहे. तसेच हदगाव पोलिस स्टेशन अतर्गत येणाऱ्या गावात ही मटका जुगाराचे अड्डे उघडण्यात येत असल्याची माहीती निवेदनात देण्यात आलेली आहे. हदगाव शहरातील परिसरात उमरखेड (हायवेरोड) परिसरात तर टोलनाकाच्या बाजुच्या शेतात व एका धाबाच्या पाठीमागे खुलेआम मोठे जुगार अड्डे चालविण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आलेल आहे.
यामुळे बहुतांशी युवावर्ग यामध्ये गुरफटल्या जात असुन, हा फार चिंतेचा विषय बनला आहे. या निवेदनावर भाजपाचे शहराध्यक्ष बाळा पाटील कदम, निळकंठ कल्याणकर, सौ लताबाई फाळके, सचिन पाटील आदीच्या सह्या असुन, राष्ट्रवादीच्या निवेदनावर अमोल कदम (राष्ट्वादी युवक काँग्रेस तालूका अध्यक्ष व संरपच रुई) व संरपंच परिषद मुंबईच्या निवेदनावर समन्वयक प्रशांत मनोहर शिंगनवाड यांच्या सह्या आहेत.