लोहा| केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण रुग्णालय, लोहा व श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या स्वंयसेवक व स्वंयसेविकांच्या मदतीने शहरात शहरात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. हि कुष्ठरोग व क्षयरोग शोध व निर्मूलन मोहिम ग्रामीण रुग्णालय व श्रीसंगाम महाविद्यालयाच्या एन एस एस व एस सी सी च्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शोध मोहिम सुरू आहे.
मोहिमेच्या प्रारंभी जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), नांदेडचे डॉ.अमृत चव्हाण व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थांना, ग्रामीण रुग्णालयाचे कुष्ठरोग विभागाचे वायभासे आर. एस. अवैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांच्या लक्षणांबाबत व त्यांच्या नोंदी कश्या घ्याव्यात या बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव गवते, एन.सी. सी. विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी. आर. ठाकूर, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. अमृत जाधव यांच्या उपस्थितीत कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण संयुक्त शोध मोहीमेची सुरुवात करण्यात आली.
सदरील रुग्ण शोध मोहिमेत वायभासे यांनी स्वंयसेवक व स्वयंसेविका यांना सोबत घेऊन लोहा शहरातील इंदिरा नगर, आंबेडकर नगर व जुना लोहा मधील कुटुंबाना प्रत्यक्ष भेटी दिल्या रुग्णांचा शोध घेण्याचे काम चालू केले आहे. या सर्वेक्षणाबरोबरच प्रत्येक कुटुंबाना सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकारने प्रकाशित केलेली कुष्ठरोग व क्षयरोगांची लक्षणाबाबतची माहितीपत्रकेही वाटप करण्यात येत आहेत. या माध्यमातून लोकांमध्ये सदरील रोगाबद्दल जनजागृती निर्माण केल्या जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल नशीर बारी, डॉ. जाधव, डॉ. हणमंते, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. मोटे, डॉ. लोहारे, डॉ. राठोड तसेच श्रीसंगाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकराव गवते, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. अमृत जाधव, प्रा. डॉ. मंगनाळे एस. व राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. आर. ठाकूर हे प्रयत्न करीत आहेत.