नांदेड| नांदेड जिल्ह्यात भविष्य निर्वाह निधी उपकार्यालय आणण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही कास्ट्राईब संघटनेचे नेते सय्यद खाजा मियॉ यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे.
नांदेड जिल्ह्यात भविष्य निर्वाह निधीचे उपकार्यालय व्हावे या मागणीसाठी गेल्या दोन व्ार्षापासून कास्ट्राईब संघटनेचे नेते सय्यद खाजा मियॉ दादा मियॉ यांनी पाठपुरावा केला आहे. रविवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले असताना कास्ट्राईब संघटनेचे नेते आणि पदाधिकारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भेटले व निवेदन दिले.
भविष्य निर्वाह निधीचे उपकार्यालय नांदेडला आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून या संबंधित प्रादेशिक उपायुक्त मुंबई यांना रितसर पत्र पाठविले आहे. त्याचा खुलासाही संघटनेचे नेते सय्यद खाजा मियॉ दादा मियॉ यांच्याकडे एका पत्राद्वारे केला आहे. नांदेडला भविष्य निर्वाह निधीचे उपकार्यालय मंजुर करण्यासाठी सय्यद खाजा मियॉ दादा मियॉ यांच्या संघटनेने पाठपुरावा केला आहे. संघटनेचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भेटल्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या उपकार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी संघटनेचे मोहनसिंघ ठाकुर, बरजोरसिंह गहिरवार, गंगाधर वडणे, रोहितसिंह ठाकुर, एकनाथ घूले, राजू सोनकांबळे, जोगेंद्र गोवंदे, आनंद गायकवाड, वसंत पावडे, युनूस खान, मारोती रेंगे पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्यासह नांदेड वाघाळा मनपातील सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.