नविन नांदेड। सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून मनपा जागेवर अतिक्रमण करून कच्चे बांधकाम केलेल्या चार मालमत्ता धारकांचे अतिक्रमण संबंधितांनी काढुन घेऊन रितसर पंचनामा केला असून या बेधडक कार्यवाही मुळे अतिक्रमण करणा-या मालमत्ता धारकात खळबळ उडाली आहे.
सिडको प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून मनपा कडे हस्तांतरित केलेल्या जागेवर कच्चे व पक्के बांधकाम केले असून अशीच तक्रार सिडको शिवाजी चौक लगत असलेल्या एन.डी.१ लगत असलेल्या मोकळ्या जागेत चार जणांनी विटा रचुन टिनशेड टाकुन बांधकाम केल्याची तक्रार सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्राप्त झाल्या नंतर सिडको क्षेत्रीय कार्यालय साहयक आयुक्त डॉ. रईसौधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी संबंधित कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या कडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित अहवाल प्राप्त होताच अतिक्रमण पथक प्रमुख राहुल सोनसळे यांनी रितसर नोटीस बजावली व अतिक्रमण काढण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी तारीख दिली.
अखेर २६ सप्टेंबर रोजी सकाळी संबंधित ठिकाणी मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको साहयक आयुक्त डॉ. रईसौधदीन, अतिक्रमण नियंत्रक गणेश शिंगे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,अतिक्रमण पथकाचे राहुल सोनसळे, वसुली लिपीक सुधीर कांबळे, राजपाल सिंग जक्रीवाले, यांच्या सह कर्मचारी ऊपसिथीत होते, यावेळी संबंधित अतिक्रमण केलेल्या पथक कार्यवाही करण्याचा इशारा देताच संबंधितांनी कच्चे बांधकाम काढून पत्रे व ईतर साहित्य काढून घेतले,तर अन्य साहित्य काढण्याबाबत वेळ मागून घेतला आहे,मनपा प्रशासनाने संबंधित अतिक्रमण करणा-या विरूद्ध पंचनामा केला आहे. या कार्यवाही मुळे अतिक्रमण करणा-या संबंधित मालमत्ता धारकांत खळबळ उडाली आहे.