नांदेड। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्या निमित्त भाजप महानगर नांदेड तर्फे सुरेश लोट यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले असून याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुरेश लोट यांच्या नवा कौठा येथील कार्यालयाचा शुभारंभ झाला.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा महानगर नांदेड च्या वतीने विविध सेवा प्रकल्प राबवण्यात येत आहेत. भव्य रक्तदान शिबिरामध्ये ८८ भाजप सदस्य व नागरिकांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक राधाकृष्ण विखे पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, विशेष अतिथी महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यकंटराव गोजेगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते,
अॅड.चैतन्य देशमुख,डाॅ. संतुकराव हंबर्डे, नगरसेवक राजु गोरे, माजी अध्यक्ष प्रा. गणपत राऊत, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन उमरेकर, शितल भालके, जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगावकर व वेंकट मोकले, सुशीलकुमार चव्हाण आशिष नेरलकर, मधुकर मानेकर, संदिप पावडे, अनिल बोरगावकर,सोशल मिडीया चे राज यादव, अक्षय अमिलकंठवार यांची उपस्थिती होती. सुरुवातीला सुरेश लोट, शिवा लोट व शिवचरण लोट यांनी भव्य पुष्पहार देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सुरेश लोट यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मार्गदर्शन करताना महसूल मंत्री विखे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून सुरेश लोट यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
खा. चिखलीकर यांनी सुरेश लोट यांच्या नवीन कार्यालयामार्फत कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद व्यक्त केला. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून भाजप महानगर तर्फे सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रसंगी व्यंकटराव मोकले, सुशीलकुमार चव्हाण, पंचायत समिती सदस्य बालाजी सूर्यवंशी, युवती अध्यक्ष महादेवी मठपती यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचलन सेवा पंधरवाडा संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. आभार शिवा लोट यांनी मानले. सुरेश लोट यांच्यातर्फे दोन हजार नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले.
यावेळी भाजपा कोषाध्यक्ष प्राचार्य बालाजी गिरगावकर , चिटणीस मनोज यादव व विपुल मोळके, शिख सेलचे जिल्हाध्यक्ष कृपालसिंग हुजूरिया, रेल पार्सल कामगार आघाडीचे गोपाळ माळगे व मारोती कुमार, सुनील रामदासी, रुपेंद्रसिंग साहू, हुकुमसिंग ठाकूर, योगेश पाटील नंदनवनकर ,अपर्णा चितळे, अनुराधा गिराम, कांचन गहलोत यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवचरण लोट, तानाजी नंदनवनकर, खंडू धोंगडे, शेख जाफर इस्माईल, देवराव धोंगडे, राम गालपाडे, धनंजय आप्पा, शिवाजी गोडबोले यांनी परिश्रम केले. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर दोन मोठे कार्यक्रम घेतल्याबद्दल सुरेश लोट यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.