८ दिवस शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज; उपचारा दरम्यान झाला मृत्यू
हिमायतनगर, अनिल मादसवार| पैनगंगा नदीकाठावरील कोठा तांडा येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारील कंटाळून आत्महत्या केली आहे. मागील महिन्यात अतिवृष्टीने नुकसानाची आलेल्या व कर्जाच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या ७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामुळे विद्यमान सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात अपयश येत असल्याचे दिसते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पैनगंगा नदीकाठावर असलेल्या कोठा तांडा येथील मयत शेतकरी बंडू गणपत राठोड यांचे वडिलांच्या नावाने ३ एकर शेती आहे. या शेतीवर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैन्केतून ८० हजारांचे कर्ज घेतलेले आहे. मात्र शेती करताना गेल्या तीन वर्षांपासून स्टेट नापिकी होते आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होऊन पिके येतील व कर्ज फेडून गुण्या गोविंदाने राहू असा निर्धार करून शेतकऱयाने खरिपात पेरणी केली. मात्र कोवळी पिके असताना अतिवृष्टीने झोडपून काढल्याने नैदीकाठावरील पिके पूर्णतः उध्वस्त झाली. उरली सुरली पिके पुन्हा इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने गेली.
त्यामुळे युवा शेतकरी चिंताग्रस्त बनला होता, वडीलही मयताचे वडील नेहमी कर्ज कधी फिटेल अशी विचारणा करायचे त्यामुळे कोणालाही न सांगता मयत शेतकरी बंडू गणपत राठोड यांनी दि.३० ऑगस्ट रोजी शेतात कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. हि बाब समाजातच तातडीने त्यांना उपचार कामी हिमायतनगर येथे दाखल करून परिस्थिती गंभीर असल्याने नांदेडला शरिक केले. दरम्यान उपचार सुरु असताना ते मृत्यूशी झुंज देत होते.
अचानक प्रकृती बिघडल्याने दि.०८ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबाचा करता धरता युवा शेतकरी गेल्याने कुटुंब निराधार झाले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणी आज दि.12 रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्यात शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नापिकी व कर्ज बाजारामुळे विषारी औषध पिंल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी हे करत आहेत.