हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील एम. ए. अर्थशास्त्र विषयाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी उन्हाळी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील एम. ए. अर्थशास्त्र या विषयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.
तसेच 12 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर स्वाती मधुकर पांचाळ हिने 80.94 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून सर्वप्रथम आली आहे. तसेच पीएचडी संशोधन पूर्व परीक्षा 2022 मध्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी विठ्ठल दत्तराव कदम हा पास झाला आहे. त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा. मा. सूर्यकांताताई पाटील माजी केंद्रीय ग्राम विकास राज्यमंत्री, भारत सरकार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. उज्ज्वला सदावर्ते आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्ता मगर उपस्थित होते.