हदगाव, शे.चांदपाशा| शिवसेनेचे काही आमदार व खासदार गद्दार झाले, माञ शिवसेनेच्या कठीण समयी माजी खा सुभाष वानखेडे शिवसेनेत आले. तर सेनेचे माजी आ नागेश पा.आष्टीकर हे सेनेत राहीले ही शिवसैनिका करिता आभिमानाची व गौरवाची बाब आहे. असे भावपुर्ण उद्गार युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी काढले.
ते हदगाव शहरात युवा सैनिकाच्या निष्ठा मेळाव्यात उखळाई सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या युवानिष्ठा मेळाव्याला हदगाव व हिमायनगर तालुक्यातील युवा सैनिकांनी बहुसंख्यने हजेरी लावली होती. प्रास्तविक नादेड जिल्हायाचे युवा सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील (आष्टीकर) यांनी केले. यावेळी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोर आमदाराच खरपुस समाचार आपल्या भाषणात केला. तर अनेक युवकासह विशेषतः मुस्लीम समाजाच्या युवकांनी वरुन सदेसाई याच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेनेत प्रवेश केला. हे प्रमुख आकर्षण यावेळी दिसुन आले युवा सेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी आपल्या अभ्यास पुर्ण पद्धतीने युवासेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सागितले की कोरोना पसरतो कसा.
या कठीण काळात जनतेचे कुटुब प्रमुख या नात्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधला. दुसरी गंभीर बाब अशी की, जेव्हा उद्ववजी ठाकरे यांची सर्जरी झालेली असतांना गद्दारानी संधी साधली व पाठीत खंजीर खुपसला, माञ तितक्याच जोशाने शिवसेना उभी राहत आहे. गद्दारांच्या मागे महाशक्ती केव्हा आपली शक्ती काढुन घेईल हे सागता येत नाही. शिदे सरकारवर न्यायालयाची टागती तलवार असुन, अखेर सत्याचाच विजय होणार असल्याच त्यांनी पञकारांच्या प्रश्नाच्या वेळी सागितले. या व्यासपिठावर नादेड जिल्ह्यातील सेनेचे जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी होते.