नांदेड| रेल्वे पटरी चे देखरेखीचे कार्य करण्याकरिता जालना-सारवाडी दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, या लाईन ब्लॉक मुळे धर्माबाद येथून सुटणारी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस आणि मुंबई येथून नांदेड कडे धावणारी मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस उशिरा धावणार आहेत, ते पुढील प्रमाणे
१) धर्माबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17688 धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 11/09/2022 ते दिनांक 14/10/2022 दरम्यान दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी ( म्हणजेच दिनांक 11.09.2022, 14.09.2022, 16.09.2022, 18.09.2022, 21.09.2022, 23.09.2022, 25.09.2022, 28.09.2022, 29.09.2022, 02.10.2022, 05.10.2022, 07.10.2022, 09.10.2022, 12.10.2022 आणि 14.10.2022 रोजी) धर्माबाद येथील तिची नियमित वेळ सकाळी 04.00 वाजता सुटण्या ऐवजी 90 मिनिटे उशिरा म्हणजेच सकाळी 05.30 वाजता सुटेल.
२) मुंबई येथून नांदेड कडे धावणारी गाडी संख्या 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस दिनांक 10/09/2022 ते दिनांक 13/10/2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी मनमाड ते जालना दरम्यान 100 मिनिटे उशिरा धावेल.