नांदेड| शहरातील रामनगर येथील विद्यार्थींनी सरस्वती शिवाजी केंद्रे हीने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे.
नुकतेच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आयआयबीची विद्यार्थींनी सरस्वती शिवाजी केंद्रे हीने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 720 गुणांपैकी 624 गुण प्राप्त केले असून बायोलॉजीमध्ये 360 पैकी 320, फिजीक्स 180 पैकी 150 तर केमेस्ट्रीमध्ये 180 पैकी 154 गुण घेतले आहेत. तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तीचे कौतुक होत आहे.