हिमायतनगर तालुक्यात दुर्गामातेचे आंनदाने स्वागत.. महिलांनी घातले दुःष्काळ दूर करण्याचे साकडे -NNL

मातेच्या आराधनेने दुष्काळी परिस्थिती व कोरोना महामारीचे कायम संकट दूर होण्याची केली कामना   

हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा मातेला स्थापनास्थळी नेण्यासाठी दुष्काळाच्या गर्तेतही महिलांनी जल्लोषपूर्ण वातावरणात तयारी केली असून, अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर दि.२६ शनिवारी मुर्त्या खरेदीसाठी मंडळांनी उपस्थिती दर्शवीली होती. उत्सवाच्या आनंदात भक्तांनी भंडारा उधळीत ऑटो, जीप, टेम्पो, हातगाडे, आदीसह मिळेल त्या वाहनाने मातेला स्थापना स्थळी नेतानाचे दृश्य पहावयास मिळाले यावेळी उदे ग आंबे उडीचा जयकारा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी मातेची प्राणप्रतिष्ठापना करून आराधना सुरु झाली.  


विघ्नहर्त्या गणेशोत्सावानंतर भाविकांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले होते. अखेर या उत्सवाची प्रतिक्षा सोमवारी संपली आहे. दुर्गा मातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मातेला गावी नेण्यासाठी महिला, पुरुषांनी शहरासह ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी अतिवृष्टीच्या दुष्काळी काळ असताना देखील उपस्थितीत झाल्या होत्या. या उत्सवासाठी दुर्गात्सव मंडळासह भाविकांनी मागील काही दिवसापासून तयारी करून मुर्त्यांची बुकिंग आणि वॊटरप्रूफ मंडप उभे केले. 


दोन वर्षाच्या कोरोना महामारीचा काळ ओसरू लागल्याने यंदा जल्लोषपूर्ण व मोठ्या आनंदाने मुर्त्या खरेदी करून रेणुका, सप्तशृंगी, महालक्ष्मी अनुसया आदींची प्रतिकृती असलेल्या मूर्त्यांना विशेषतः तेलंगाना भागातील महिलामंडळांनी मागणी केल्याचे दिसून आले. धुमधडाक्यात उत्सव साजरी होत असल्याने ठिकठिकाणी साउंड सिस्टिम, डेकोरेशन व दांडिया गरबा खेळून उत्सव साजरा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळी स्थापना स्थळी नेल्यानंतर उत्सहात आरती महापूजा करून कोरोना महामारीचे संकट दूर होण्याची कामना आणि दुष्काळाचे संकट दूर करून यावर मात करण्याची शक्ती देण्याचे साकडे घालत मातेची आराधना केली आहे.    

बेन्टेक्सच्या दाग - दागिन्यांना सुद्धा आला भाव


एरवी बेन्टेक्सच्या दागिन्यांना मोल नसले तरी दुर्गा उत्सवानिमित्त या दागिन्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. गंठन, हार, कर्णकुंडल, झुंबर, गंगावन, कंबरपट्टा आदीसह सुवासिनीच्या सौभाग्याचे लेणे असलेला हिरवी शालू, लाल रंगाची ओढणी व बांगड्याना सुद्धा चांगला भाव आल्याचे दिसून आले. तसेच हळदी - कुंकवालाही मोठी मागणी झाली असून, महागाईच्या काळातही महिलांमध्ये उत्सवाचा आनंद दरवर्षीप्रमाणे दिसून आला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी