महाराष्ट्रातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा उपयोग करणार -नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार -NNL

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने त्यांचा मुंबई येथे भव्य सत्कार कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद


मुंबई।
21 व्या शतकामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रश्नचिन्ह मनात उभा करून जगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक कॉस्मेटिक सारखे हास्य निर्माण  करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा वापर करणार असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आयोजित मुंबई येथील भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी स्पष्टपणे मनमोकळ्या स्वरूपात मत व्यक्त केले. 

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्याच्या मंत्रिमंडळात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची वर्णी लागल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार सोहळा मुंबई येथील वाशी परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष, समाजभूषण नंदकुमार गादेवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मदन येरावार, आमदार समीर कुणावार आदी मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होते.


सत्काराला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास अनेक मत व्यक्त करीत आपल्या मनातील संकल्पनेला वाचा फोडून दिलखुलासपणे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले 21 व्या शतकामध्ये अनेक प्रश्न अनेक विषय समोर असताना प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे प्रश्नचिन्ह घेऊन जगत आहे मै और मेरा परिवार, हम आपके कौन है असा विचार ठेऊन जगत असतानाच अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कार्य विभागाचा वापर करून त्या माध्यमातून अनेक प्रकारचे काम करण्याची योजना मी आखत आहे. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना त्यांनी अनेक विविध प्रश्न मांडून दिलखुलासपणे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाच्या आवाहनाला प्रतिसाद देत  सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते तर मुंबई भागात राहणारे सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते 

सन्मानपूर्वक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सोनेरी पुणेरी पगडी देऊन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेकडून सत्कार करण्यात आला  प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने वेगवेगळा सत्कार ही संपन्न झाला. व्यासपीठावर महाराष्ट्र आर्य विषय महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई, उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भानुदास वट्टमवार, अनिल मनठकर,नंदकुमार मडगूलवार, जयंत बोनगीरवार, सुधीर पाटील, राजू मुक्कावार, राम शेट्टी, राजू सेठ पारसेवार, सौ. कोले, सौ. वट्टमवार, संघटन प्रमुख प्रदिप कोकडवार,

प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांच्यासह   अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात  महासचिव गोविंदराव बिडवई यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगून महासभा सर्वसामान्य समाज बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी आपल्या भाषणात नामदार सुधीर भाऊ मुनवंटीवार यांचा मुंबई येथे सत्कार करण्याचे उद्दिष्ट सांगून महाराष्ट्र आर्य भविष्य महासभा राज्यात एक आदर्श निर्माण करण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले महासभा महाराष्ट्र राज्यसह विदर्भात संपूर्ण जिल्ह्यात निर्माण करून स्थापन करून महासभेच्या माध्यमातून सर्वसामान्य समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार आहे असे सांगितले. 

सुञ संचलन पंढरपूर येथील डॉ. सचिन लादे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदिप कोकडवार यांनी केले. या कार्यक्रमास बीड लातूर संभाजीनगर धाराशिव सोलापूर जालना परभणी हिंगोली नांदेड वर्धा नाशिक चंद्रपूर नागपूर अकोला यवतमाळ मुंबई पुणे पंढरपूर तेलंगाना आंध्र प्रदेश आदी भागातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी