उमरी नगरपरिषदेत मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन व 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा -NNL


उमरी/नांदेड।
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उमरी शहरातील स्वातंत्र्य सैनिक यांचे वारस, माजी सैनिक गुणवंत विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू व माजी नगराध्यक्ष यांचा भव्य सत्कार समारंभ उमरी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला.

त्यावेळी माननीय श्री. राजेश संभाजीराव पवार साहेब, आमदार नायगाव विधानसभा मतदारसंघ तसेच मा.शैलेश फडसे,जिल्हा प्रशासन अधिकारी,नांदेड , मा.ए.बी.रेडकर साहेब,न्यायाधिश, मा.शिरिष गोरठेकर, मा.सभापती पं.स.उमरी, मा.कैलासभाऊ गोरठेकर, संचालक नांदेड जि.म.बँक व जि.प.सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार व इतर प्रमुख पाहुणे यांनी दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.राजेश संभाजी पवार साहेब, आमदार नायगांव वि.मतदारसंघ हे होते. तर सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन मा.शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर माजी सभापती पंचायत समिती उमरी,श्री.कैलास भाऊ देशमुख गोरठेकर,संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक, माजी नगराध्यक्ष श्री.प्रविण सारडा,संजय कुलकर्णी, सुभाष पेरेवार, डॉ.एम.एम.महिंद्रकर, विजयकुमार उत्तरवार, सविता आलसटवार, सौ.सरिता येरावार, सौ.अनिता अनंतवार, श्री.म.रफिक सज्जन, सौ.अनुराधा खांडरे तसेच मा.शैलेश फडसे, जि.प्र.अधिकारी, नांदेड, मा.ए.बी.रेडेकर,न्यायाधिश उमरी, मा.धनंजय थोरात, मुख्याधिकारी न.प.मुखेड, सौ.निलम कांबळे, मुख्याधिकारी धर्माबाद, मा.अमोल चौधरी, न.प.बिलोली, मा.गाढे साहेब, मुख्याधिकारी मुदखेड, श्री.व्ही.एम.मठपती, उप कार्यकारी अभियंता,उमरी, संजीव विठ्ठलराव सवई,शासकीय गुत्तेदार उमरी,पारसमल दर्डा, किशोर पबीतवार, साईनाथ जमदाडे, खाजा सेठ सज्जन सेठ इत्यादी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमामध्ये उमरी शहरातील नूतन विद्यालय हॉ.ज्यु.कॉलेज येथील एकुण (52), यशवंत वि.हॉ.ज्यु.कॉलेज येथील ( 35), प्रियदर्शनी कन्या प्र.शाळा येथील ( 28 ) व इतर विद्यार्थ्यांना विविध स्पध्येर्तील खेळाडु तसेच 10 वी व 12 वी व NEET च्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव करुन प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच उमरी शहरातील माजी नगराध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांचे वारसदार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यासह उमरी शहरातील पत्रकार बांधव यांना सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. 

सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा.मुख्याधिकारी, गणेश रामचंद्र चाटे,यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी न.प.चे कार्यालय अधिक्षक श्री.अर्जुन गव्हाणे, अभियंता संतोष मुंढे, श्रीनिवास बारोळे, लेखापाल ज्योतीराम जाधव, सत्यनारायण पिंडकुरवार, रघुनाथ जोंधळे, वरिष्ठ लिपीक सचिन गंगासागरे व गणेश शंकरराव मदने, चंद्रकांत श्रीकांबळे- मुकदम, सुर्यकांत माळवतकर,रमाबाई काठोळे सुरेश शिंदे, शंकर पाटील, शकीलखॉन पठाण, पिराजी गायकवाड, नरेंद्र खंदारे, अंकुश सवई, आकाश खंदारे, गौतम सोनफळे, शंकर माने, चंद्रप्रकाश मदने, गंगाधर पवार, हमीद बेग, माधव जाधव, शमीम बेग,पंडीत जाधव, माधव जाधव, सुरेश मुदीराज, मारोती चौदंते, राजेश्वर खांडरे, सुभाष सिंगरवाड व इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरीष्ठ लिपीक श्री.गणेश शंकरराव मदने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गंगाधर पवार यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी