हिमायतनगर। तिर्थक्षेत्र बोरगडी येथे वै. साहेबराव (कृष्णा) यांच्या 28 व्या पुण्यस्मरणार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तत महोत्सवास सुरूवात झाली असून या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी येथील किर्तनकार ह.भ.प.माधवबुवा बोरगडीकर यांच्या कडून दरवर्षी वै. साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्यस्मरणार्थ सप्ताह चे आयोजन करण्यात येते.यावर्षी देखील 28 व्या पुण्यस्मरणार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, महोत्सवाचे दि. 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहातील कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 6ते 9 पारायण, 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन, या सप्ताहातील किर्तनकार ह.भ.प.लक्ष्मण महाराज बोरगडीकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज धानोरकर, ह.भ.प.डॉ लक्ष्मीकांत रावते, ह.भ.प.प्रबोधन महाराज पंढरपूरकर, ह.भ.प.पंजाबराव महाराज चालगणीकर, ह.भ.प.भिमराव महाराज फुटाणकर, ह.भ.प.निळोबा महाराज हरबळकर, यांचे हरिकीर्तन होणार आहे तर दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10 काल्याचे किर्तन ह.भ.प.निळोबा महाराज हरबळकर यांचे होणार आहे. या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. माधवबुवा बोरगडीकर व मारोती मंदिर बोरगडी ग्रामस्थांनी केले आहे.