नांदेड| नांदेड जिल्हा पोलिस दलातील विमानतळ पोलिस ठाण्याचे मिलींद लोणे यांची जमादारपदी पदोन्नती झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नुकतेच पदोन्नतीचे आदेश काढले आहेत.
मिलींद लोणे हे प्रसिद्ध टेबल टेनिस खेळाडू आहेत. महाराष्ट्र संघाचे त्यांनी कर्णधारपद भूषविले आहे. अनेक राष्ट्रीय स्तरावरील टे.टे. स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी चमकदार राहिली आहे. लोणे यांच्या पदोन्नतीचे त्यांच्या मित्रपरिवारासह आप्तस्वकीयांकडून अभिनंदन होत आहे.