नांदेड। भारताच्या स्वातंञ्या नंतरही रझाकारांच्या जुलूमी राजवटीतुन कष्टकरी,उपेक्षित व सर्वसामान्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील पहिले हुतात्मे गोविंदराव पानसरे यांच्यासह सर्वच हुतात्मांच्या बलीदानाची आठवण करूण देणे ही आपली जबाबदारी आहे.असे प्रतिपादन पञकार श्री गोविंद मुंडकर यांनी केले.ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने लोहगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक गणपत उमरे यांची तर माजी.सभापती जि.प नांदेड संजय माधवराव बेळगे यांची उपस्थिती होती. मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सत्कार व ज्येष्ठ पञकार श्री गोविंदराव मुंडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज, डाँ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन व स्वातंत्र्य संग्राम लढ्यातील सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर पञकार गोविंद मुंडकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील पहिले हुतात्मे गोविंदराव पानसरे यांचे जीवन पट यासह हैदराबाद मुक्ती दिन आणि पोलिस अँक्शन यावर सविस्तर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पांढरे यांनी केले.
यावेळी विठ्ठल देशमुख दत्तगीर गोस्वामी,दता पाटील पांढरे, यादव कोरनुळे व्यंकट नाईनवाड, शिवप्रसाद स्वामी, उत्तम वानोळे, आनंद पांढरे, हनुमंत पांढरे ,शिवाजी मोरे ,मालू वाकडे, ज्ञानदीप वानोळे, अंकुश देशमुख,नागनाथ शेटकार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.