किनवट| गंगापूजनाचा कार्यक्रम 25 मंदिर विकास समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. नारायण महाराज माहादापुरकर यांच्या हस्ते व मा.आमदार भीमराव केराम व नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध केंद्रे यांनी केले. या कार्यक्रमात ह.भ.प. नारायण महाराज यांनी त्यांच्या वाणीतून प्रवचन करून गंगेचे महत्त्व भाविकांना सांगितले व तसेच गंगेत जाऊन विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर 6 वाजता गंगेची महाआरती करण्यात आली. आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किनवट शहरातील 25 मंदिराचे ट्रस्ट यांच्या हातभार लागले व या कार्यक्रमाला हजारो भाविक भक्त हार्दिक घेऊन उपस्थित होते.