नागपूर| यशवंत मनोहर प्रतिष्ठानचा उत्कट कवितासंग्रहाला दिला जाणारा कवीसुर्य यशवंत मनोहर पुरस्कार यावर्षी विवेक काटीकर यांच्या 'दिक्काल धुकं पसरलेलं सर्वत्र ' या कवितासंग्रहाला दिला गेला आहे. रोख रुपये दहा हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी दिली.
यशवंत मनोहर प्रतिष्ठानचा सन २०२१ साठीचा पुरस्कार सुप्रसिद्ध कवी विवेक काटीकर यांना जाहीर झाला आहे. त्यांचा 'दिक्काल धुकं पसरलेलं सर्वत्र ' कवितासंग्रह दिल्लीच्या काॅपर काॅइन या नामवंत प्रकाशनानं प्रकाशित केला असून २५ सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड येथे होऊ घातलेल्या फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनार मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञाधर ढवळे यांनी कळविले आहे. व्यासंगी लेखक आणि वाचक असलेले विवेक काटीकर हे इंडियन बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत. 'खेळ' नियतकालिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत. आंबेडकरी निष्ठेचे कवी आणि भाष्यकार म्हणून ते महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.