सामोपचाराने मिटविलेल्या वादात केव्हाही अधिक सकारात्मकता - प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर -NNL


नांदेड|
नांदेड जिल्हा न्यायालय अंतर्गत मध्यस्थी केंद्र व लोक न्यायालयाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामोपचाराने मिटविलेल्या वादात केव्हाही अधिक पावित्र्य असते. यात एकमेकांची मने, दुरावलेली मने, वेळेचा अपव्यय, होणारा खर्च या साऱ्या बाबीपासून सुटका होवू शकते. ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, जी प्रकरणे सामोपचाराने सुटू शकतात, अशा सर्व संबंधित व्यक्तींनी यासाठी खुल्या मनाने पुढे झाले पाहिजे, असे आवाहन प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले.

मोटार अपघात नुकसान भरपाई अर्ज निर्मला विरुध्द कपील व तर्थद जिल्हा न्यायालय नांदेड या न्यायालयातील मोटार अपघात नुकसान भरपाई अर्ज शिवकुमार विरुध्द कपील हे दोन्ही प्रकरण नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील मध्यस्थ केंद्राकडे मध्यस्थीसाठी ठेवण्यात आले होते. यावर अर्जदार निर्मलाबाई व इतर आणि क्रुजरची विमा कंपनी इफको टोकिओ इन्सुरन्स यांच्यात तडजोड होऊन सदरील प्रकरण रुपये 37 लाख 50 हजार मध्ये मिटविण्यात आले. याचबरोबर शिवकुमार पांचाळ यांचे प्रकरण रुपये 80 हजारामध्ये तडजोड होऊन मिटविण्यात आले. या प्रकरणात मध्यस्थी केंद्रामार्फत तडजोड होण्यासाठी प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्यामार्फत व मार्गदर्शनाखाली मध्यस्थी करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व लोकन्यायालय, मध्यस्थ केंद्र याचे महत्व विशद करून सांगितले.

न्यायालयीन खटल्यात  दिवाणी,  फौजदारी,  एन.आय.ॲक्ट, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे  तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दखल पूर्व प्रकरणे न्यायालयात येतात. यात लागणारा वेळ व इतर बाबी लक्षात घेता संबंधितांनी लोकन्यायालयाचा व मध्यस्थी केंद्राचा अधिक लाभ घ्यावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन खटल्यांना सौहार्दपूर्ण पर्याय हा सुसंवाद, समेट व लवाद यात दडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी