शहिद भगतसिंग जयंती दिनी माहूर येथे सीटूची वन कामगार - कर्मचारी शाखा स्थापना -NNL

माहूर| सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन वन कामगार - कर्मचारी संघटनेची शाखा माहूर येथील कपीलेश्वर धर्मशाळा परिसरात शहिद भगतसिंग जयंती दिनी दि.२८ सप्टेंबर रोजी सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापन करण्यात आली.

शहीद भगतसिंगाना अभिवादन करून वन कामगारांच्या अडचणी व मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.प्रलंबित मागण्या,थकीत वेतन आणि कामावरून कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. आदी प्रमुख मागण्या वन कामगारांनी केल्या.यावेळी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. किसान सभेचे राज्य सहसचिव कॉ. शंकर सिडाम,माकपाचे तालुका सचिव कॉ.किशोर पवार, एसएफआयचे जिल्हा सहसचिव शंकर बादावाड,विजय लोहबंदे,प्रफुल कऊडकर यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या.

माहूर येथे वन कामगार - कर्मचारी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली असून नवीन कमिटी निवडण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष सजूबाई राठोड, गौतम रणवीर, सहसचिव शकुंतला कौठेकर,भीमराव सिडाम, सचिव मधुकर राठोड तर कोषाध्यक्ष पदी दिगांबर टेंबरे आदींची एकमताने निवड करण्यात आली.तर तीन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी