शिवछत्रपती विद्यालयात शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी चालविली शाळा -NNL


लोहा|
आम्ही चालवू-आमची शाळा या उपक्रमा अंतर्गत शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे प्रशासन चालविले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व शाळेत शिक्षक आम्ही चालवू -आमची शाळा 'या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा चालवावी असे निर्देश दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारीदिग्रसकर प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या सूचनेनुसार लोहा तालुक्यात बीईओ रवींद्र सोनटक्के यांनी तालुक्यात सर्व शाळेत स्वयंशासन दिन घेण्याचे आवाहन केले.

शिवछत्रपती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी ई वडजे यांनी आम्ही चालवू -आमची शाळा'अंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना एकदिवस शाळा प्रशासन चालविण्याची जबाबदारी दिली. बी एन गवाले यांनी तयारी करून घेतली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार यांच्या शाळेतही हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, केंद्र प्रमुख एन एस कसबे यांनी भेट दिली. स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका म्हणून शुभांगी ज्ञानेश्वर तेलंग व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ओंमकार मनोहर जेलवाड या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. या उपक्रमा अंतर्गत दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उत्कृष्ट अध्यापन व कार्य करणाऱ्या स्वयंशासन दिनातील सहभागी शिक्षक -कर्मचारी यांना बक्षीस देण्यात आले 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी