रत्नाळी येथे बड्डेम्मा पारंपारिक सण उत्साहात साजरा -NNL


धर्माबाद।
येथील नगरपालिका कार्यकक्षेत असणाऱ्या मौजे रत्नाळी येथे अतिशय पारंपारिक असलेला  बड्डेम्मा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तेलंगाना महाराष्ट्र सीमेवर उपरोक्त सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बड्डेम्मा ही एक आदिशक्ती, दिव्यशक्ती असणारी देवी असते. पोळा या सणापासून हा उत्सव साजरा होतो. अमावास्या झाली की पहिल्या  घटस्थापनेच्या दिवशी बड्डेम्माचे विसर्जन करण्यात येते.

धर्माबादचे भूमिपुत्र तथा बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावाड यांच्या प्रेरणेतून व संगम ग्रुपच्या सौ. लक्ष्मीबाई राजरेड्डी बोमीनवाड यांच्या पुढाकारातून यावषीर्चा हा सण संगम ग्रुप मोठा उत्सवात साजरा करत एकच कलरचे साडी  उत्साहवर्धक ठरला. महिलांनी एकसारखी वेशभूषा केली होती. सार्वजनिक मंडळ,मरेम्मा गल्ली, संगम ग्रुप, चावडी गल्ली, वीरभद्र मंदिर गल्ली, बुरुड गल्ली आदी भागातून बड्डेम्मा सणांमध्ये मोठा सहभाग महिलांनी नोंदवला.
 
डीजे संगीत प्रणाली व बँड बाजा मध्ये लेझीम टिपº्या खेळत महिलांनी वाजत गाजत बड्डेम्माला रत्नाळी येथील मोठ्या तलावात विसर्जित केले. प्रतिवषार्पेक्षा यावषीर्चा हा सोहळा लक्षवेधी ठरला.अतिशय शांततेत मिरवणूक काढण्यात आली कुठे गाल बोटं न लागता विसर्जन करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी