लोहा| आजच्या स्पर्धेच्या काळात किमान कौशल्य असणे गरजेचे आहे .केवळ पारंपरिक पदवी संपादन केल्या नंतर रोजगार मिळणे आता अवघड झाले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्र ज्ञानाचा वापर केला पाहिजे ते कौशल्य आत्मसात केले पाहिजे असे मार्गदर्शन तहसीलदार व्यंकटेश मुंडे, आयटीआय चे प्राचार्य एस एल कोंडावार यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी लोह्याच्या शासकीय आयटीआय मध्ये शासकीय दीक्षांत समारोह ( पदवीदान ) पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य कोंडावार एस एल होते. विशेष निमंत्रित तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांची उपस्थिती होती. शासकीय आयटीआय मध्ये वेगवेगळे कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार मुंडे व प्राचार्य कोंडावार यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. येथून बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या कंपनी स्वयंरोजगार मिळणार असून स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहणार आहात.
मेहनत जिद्द चिकाटी ठेवून जॉब करा असे मार्गदर्शन करण्यात आले. स्ते पदवीदान समारभ सूत्रसंचालन खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन आदेप्पा एस एस व श्री लोणारे यु बी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री लोणारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयटीआय संस्थेतील, पंडित आर पी, हार्डे सुशील, गुद्दे एस बी. श्रीमती वडजकर डी डब्ल्यू, पांडुर्णीकर डी आर, जमीर पठाण व वंजे, श्रीमती वाघमारे यांनी परिश्रम घेतले.