नांदेड| एका मुलीने आत्महत्येच्या उद्देशाने आसना नदीच्या पुलावरून उडी घेतल्याची घटना सोमवारी घडली. मात्र, कर्तव्यावर असेलेल्या विमानतळ पोलिसांनी एका युवकाच्या मदतीने नदीतून बाहेर काढून तिचा जीव वाचावीला आहे.
सोमवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी आसना नदीवर असलेल्या पुलावरून यशवंत कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीने आत्महत्येच्या हेतूने नदीत उडी घेतली. कर्तव्यावर असलेले मार्शल पोलिस अंमलदार बंडू जाधव, जमादार दारासिंग राठोड, अंमलदार भिसे यांनी तेथे असलेल्या श्रीकांत संजय सोनाळे यांच्या मदतीने सदर मुलीस पाण्यातून बाहेर काढून जीवदान दिले. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने आपले नाव काजल व्यकंटी जाधव (रा. इजळी, ता. मुदखेड) असे सांगितले.