योगामध्ये राष्ट्रीय पातळीवरील पदक मिळवून ओरिसामध्ये गोल्डमेडल मिळविणारी डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालयाची नामांकित विद्यार्थीनी कु.वर्षा माणीक मदने हिचा सोमवारी राहत्या घरी दुचाकीला उडवून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ट्रकने माणीक मदने यांच्या घरात ट्रक शिरला यावेळी स्नानासाठी गेलेल्या कु.वर्षा मदने हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यावेळी तिन दुचाकी अपघातात चेंदामेंदा झाल्या,ना.अशोकराव चव्हाण यांनी भेट देऊन सांत्वन केले.यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणपतराव तिडके,सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,युवकचे पप्पू पाटील कोंढेकर, निळकंठराव मदने,माणीक मदने,पुंजाराम मदने, गंगाधरराव देशमुख, शकुराव हापगुंडे,बाबूराव साबळे, विठ्ठलराव देशमुख,रामलू बेतीवार,हासनराव मदने,भाऊराव मदने,राजकुमार मदने,गुलाब शेख, यांची उपस्थिती होती.