पैनगंगा नदीकाठावरील गावात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या -NNL

चोरट्याना पकडण्यासाठी तरुणांचे सहकार्य लाभेल- त्यांचा सन्मान होणार 


उमरखेड/हिमायतनगर| यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येणाऱ्या मौजे बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत चोरटयांनी धुमाकूळ घालत घरफोडी करून साहित्याची नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. या चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ झाल्यामुळे मुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना अंजाम देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी बिटरगाव पोलीस प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना काळ यश आले असून, काही तरुणांच्या मदतीने पॉलिसीची चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील बहुतांश चोरटे हिमायतनगर तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आल्याने विदर्भ - मराठवाड्याच्या नदीकाठावरील परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये याचं टोळीचा हात असेल अशी शंका नागरीकातून वर्तविली जात आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२७ च्या रात्रीला देखील या चोरट्यांच्या टोळीने बिटारगाव परिसरात धुमाकूळ माजविला या चोरट्यांच्या टोळीने एक एक करत येथील शेख शबिर शेख हनिफ रा. बिटरगाव यांचे घरापासून चॊरीच्या सत्राला सुरुवात केली. मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास घराचा कुलूप - कोंडा तोडुन ७ चोरट्यानी घरात प्रवेश करूण रॉड व कुऱ्हाडीने वार करून जीवघेणा हल्ला करूण त्यांना जखमी केले. तसेच घरातील दागदागीने व गळयातील मुद्देमाल असा एकुण ५४ हजारांची लूट बळजबरीने करून  पळुन गेले. त्यानंतर येथीलच राजु गुलाबराव देवकते यांचे १५ हजार रुपये, तर शेख सुफीया शे. मुसा यांचे गळयातील सोन्याची ३५ हजारांची पोत, संजय गंगाराम बुटले यांचे हजारो रुपये आणि हनुमान मंदीर येथील दानपेटी फोडुन ३ हजार असे एकुन ९४,५०० रुपयांचा मुद्देमालावर चोरट्यानी हात साफ केला.


तसेच वनविभाग जेवली रोड येथे कर्तव्यावर हजर असलेले वनविभागाचे कर्मचारी राजु देवकते यांचेवर दगडफेक करून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. पोस्ट कार्यालयाची तोडफोड करून सरकारी मालत्तेचे ५० हजार रुप्याचे नुकसान केले आहे. याबाबतची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रताप दत्तात्रय भोस यानी लागलीच याबाबतची माहीती वरीष्ठांना देवुन आपल्या सहकार्यांना घेऊन बिटरगांव परिसर पिंजून काढला. यावेळी उमरखेड -हिमायतनगरच्या मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील गांजेगाव पुल व पिपळगाव पुल येथे नाकाबंदी लावली. आणि सापळा रचून घरफोडी करणाऱ्या ७ चोरट्याने शिताफीने पकडले. 


चोरटे या मार्गाने पैदल येत असताना त्याना पोलीस असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे चोरट्यानी दबा धरून पीपळगाव पुलाच्या बाजूला बसले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने 
बा धरून बसलेल्या चोरट्याना पीपळगाव -वारंगटाकळी येथील काही तरुणांच्या सहकार्यांनी चारी बाजूने घेरून झडप टाकली. त्या चोरट्यामधील एकाच्या हातात कु-हाड, चाकु, लोंखडी रॉड व दगड होते. चोरट्याना पकडताच एकाने पोलीसावर दगडफेक व अन्य प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीसानी मोठ्या हिम्मतीने हल्ला चुकवून त्यांचा पाठलाग करत ३ आरोपीना बिटरगाव पिपळगाव येथील पोलीस मित्राच्या मदतिने पकडले तर अन्य ४ चोरटे हे पळुण गेले. पळुन गेलेल्या आरोपी शोध कामी दोन पथके नेमुण एक पथक गांजेगावकडे व एक पथक जेवली पिपळागावं येथे रवाना करण्यात आले होते.


गांजेगाव भागाकडे गेलेल्या पथकानी गांजेगाव येथील पोलीस मित्रांच्या मदतीने दोन आरोपी पकडले. जाकी बावाजी चव्हाण वय २८ वर्ष, मांगीलाल श्रीरंग राठोड वय ३८ वर्षे रा. हिमायतनगर जि.नांदेड, विकास श्रीरंग राठोड वय २२ वर्षे, रा. हीमायतनगर जि. नांदेड, निलेश गब्बरसीगं राठोड वय २२ वर्षे रा हदगाव जि.नांदेड, दत्ता मांगीलाल राठोड वय ३० वर्षे रा. गणेशवाडी ता. हीमायतनगर जि.नांदेड पाच आरोपीताना पोलिसांनी अटक केली असून, सदरील ५ हि आरोपी हे (फासेपाराधी) समाजातील असल्याचे पोलिसांनी जरी केलेल्या प्रेसनोट मध्ये दिली आहे. या आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले ०३ चाकु, १ रॉड, ०१ कु-हाड, दोन मोबाईल किमंत २० हजार गुन्हयात चोरी गेलेल्या मालापैकी २२ तोळे चांदीचे गंठण किमंत २० हजार, १ जोडवे किमंत २ हजार व ७ ग्राम सोन्याचा गळातील हार असा एकुण ७७००० रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे.


सदर धडाकेबाज कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव दरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पडावी, यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, पोलीस नाईक मोहन चाटे, अतिश जारंडे, गजानन खरात, रवी गीते, विद्या राठोड, दत्ता कुसराम, सतीश चव्हाण, निलेश भालेराव, स्वप्रिल राजवाडे, फिरोज काजी, होमगार्ड चंद्रमणी वाढवे यांनी सहभाग घेऊन केली आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात धुमाकूळ घातलेल्या चोरट्याना अटक केल्याबद्दल पोलीस बांधवांचे नागरीकातून अभिनंदन केले जात आहे. तसेच अन्य फफर चोरट्याना अटक करून यांनी कुठे कुठे चोरी केल्या याचं उलगडा करावा अशी रास्ता मागणी उमरखेड- ढाणकी - बिटारगाव -हदगाव- हिमायतनगर - किनवट - माहूर तालुक्यातील जनतेतून केली जात आहे.  

चोरी करून पलायन केलेल्या चोरट्याना पकडण्यासाठी पोलिसाना सहकार्य करणाऱ्या त्या तरुणांचा यथोचित सन्मान केला जणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांबरोबर गावातील ज्या तरुणांनी आपल्या जीवावर उदार होऊन पोलिसांना मदत केली त्या तरूणांचा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाईल असेही ते म्हणाले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी