मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बु येथे दि.२४ रोजी अंगणवाडी केंद्रात पोषण आहार अभियाना अंतर्गत पोषण माह पाककृती प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील महिलांना विविध प्रकारचे पर्थिने कोणत्या आहारातून मिळतात याची महिती देण्यात आली.
यावेळी अनेक प्रकारचे आहार ज्यातून आवश्यक असलेली जीवनसत्व भेटतात असे पदार्थ अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी बनवून आणून पोषण माह पाक कृती प्रदर्शन भरविले व त्याची माहिती प्रत्येक महिलांना सांगितली यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मुखेड मिथुनकुमार नागमवाड यांनी पोषण आहरा बद्दल माहिती देताना म्हणाले की पोषण अभियान हे केंन्द्र सरकार राबवीत असलेले एक महत्वकांशी अभियानापैकी एक अभियान आहे, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कुपोषण मुक्त, बालमृत्यू रोखणे हा आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व पोषण आहारासाठी अगंणवाडी सुरुकरण्यात आल्या आहेत, यावेळी उपसरपंच शरद पाटील , प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकर उलिगडे, पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, पर्यवेक्षिका सुरेखा भंडारे ,अंगणवाडी सेविका सुरेखा अंबुलगेकर ,नंदा डोपवाड,सुनीता भोसीकर राजुरा विभागातील सर्व सेविका गावातील महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.