सेवा पंधरवडा निमित्त तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्राचे वितरण - NNL


नांदेड|
शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त आज 32 तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय यांची नॅशनल पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात आली. 


सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड  आणि कमल फाउंडेशन नांदेड व राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वझर, ता. मुखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीयपंथीयाच्या सर्वतोपरी विकासासाठी सांगवी येथे गौरी बकस यांच्या निवासस्थानी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. 

यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर , समाज कल्याणचे श्री. दवणे , कमल फाउंडेशन नांदेड अध्यक्ष अमरदीप गोधने, वझर येथील राजा रामभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनिता सदाशिव शिंदे, तृतीयपंथांच्या गुरु गौरी बकास व  तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी