उस्माननगर, माणिक भिसे। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोंढे सांगवी ( ता. लोहा) येथे " किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना व गुलाबी बोंड आळी नियंत्रण जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
दि. २० रोजी ७ -१२ कृषी फार्मर प्रोड्यूसर कंपनी लोंढे सांगवी मालक आनंदा लोंढे यांनी जनजागृती उपक्रमांचे आयोजन प्रकाश मुकींदराव लोंढे यांच्या शेतावर घेण्यात आले होते. कार्यक्रमास यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविचंद्र चलवदे, डॉ. चिमण शेटे, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी अरविंद गायकवाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी शैलेश वावळे, विद्यापीठ शास्त्रज्ञ बसवराज भेदे, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, कृषी अधिकारी पी. आर. माने, अनिल जोंधळे, मंडल कृषी अधिकारी टेकाळे, वडवळे, ग्रामसेवक कल्याणकर, तलाठी राऊत, सरपंच नागोराव गवळे, आनंद लोंढे, माणिका काळम, विश्वनाथ लोंढे, दत्तराम लोंढे, जोशी सांगवी चे रामराव पाटील मोरे, परमेश्वर थोटे, शिवाजी लोंढे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकरी मंडळींना सुरक्षित फवारणी साठी सुरक्षा किट , जनावरांना उद्भवणारे आजार, उपाययोजना माहिती पुस्तिका देण्यात आली. सामुदायिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.