तब्बल १ हजार रुग्णांची तपासणी व उपचार
शेवटच्या रुग्णालाही लाभ : मोठ्या प्रतिसादाने शिबीराची सांगता
नांदेड। मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, लायन्स क्लब मिडटाऊनच्या वतीने शनिवार दिनांक २२ ते २४ सप्टेबर या कालावधीत आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या आरोग्य शिबिराची सांगता शनिवार दि. २४ सप्टेबर रोजी झाली. या तीन दिवसात तब्बल १ हजार रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील ३० तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल झाली होती. प्रति आरोग्य शिबिराप्रमाणेच या शिबिरासही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रुग्ण आले होते. शेवटच्या रुग्णालाही लाभ व्हावा यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांसाठी एम. आर. आय. सिटी स्कॅन, इ. इ. जी. वाचा उपचार, भौतिकउपचार आदींची निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
आरोग्य शिबीरातील रूग्णांवर वाडिया, जसलोक व एसआरसीसी रुग्णालयाच्या प्रसिद्ध बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे यांच्या टिममधील डॉ. प्रज्ञा गाडगीळ, डॉ.ऋता देव, डॉ. श्रेया गांधी, डॉ. चिन्मय चौधरी, डॉ. ऐरावती, डॉ. प्रज्ञा, डॉ. सोनम, फिजिओ थेरपिस्ट आशा चिटणीस, उर्मी शहा, डॉ. जल्पा बेंगाली सह तीस तज्ञ डॉक्टरांच्या टीमने आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार केले आहेत.
या शिबिरास शेवटच्या दिवशी दै. प्रजावाणीचे कार्यकारी संपादक शंतनू डोईफोडे, जि.प. चे समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, नगरसेवक प्रशांत तिडके, विजय होकर्णे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून शिबिराबाबतची माहिती घेतली. नांदेडच नव्हे तर मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागातील रुग्ण व लगतच्या राज्यातील मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी लाभदायक ठरत असलेल्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल या सामाजिक कार्याची सर्वच मान्यवरांनी प्रशंसा केली आहे.
रुग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्र. उपाध्यक्ष कमल कोठारी, बनारसीदास अग्रवाल, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, अंकित अग्रवाल, लायन्स मिड टाऊनचे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी व प्रकल्प समन्वयक प्रवीण अग्रवाल आदी पदाधिकारी शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित होते. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल, मुरलीधर पाटील, वसतीगृह अधीक्षक संजय शिंदे व आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.